युवकांसाठी 'से नो टू ड्रग्ज' हा संदेश

08 Jun 2025 17:25:29

Stay away from drugs

डोंबिवली : शिवछत्रपती राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून ईगल ब्रिगेड फाउंडेशनच्या सदस्यांनी रायगड किल्ला येथे युवकांसाठी 'से नो टू ड्रग्ज' हा संदेश दिला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून आजच्या युवा पिढीनेही ड्रग्ज नामक शत्रूला नमवण्याचे धैर्य दाखवावे हा संदेश देण्याच्या उद्देशाने ईगल ब्रिगेड फाउंडेशनचे सदस्य रायगडावर गेले होते.

यावेळी ईगल ब्रिगेड फाउंडेशनच्या सदस्यांनी युवकांना 'से नो टू ड्रग्ज' आणि ड्रग्जच्या विळख्यापासून आपण दूर राहावे असा संदेश दिला.
याप्रसंगी शर्वर शिंत्रे,आदित्य मेंडगे, साईनाथ वाईकर हे उपस्थित होते. ईगल ब्रिगेड फाउंडेशनचे संस्थापक विश्वनाथ बिवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
Powered By Sangraha 9.0