काँग्रेसच्या दुटप्पी धोरणांवर विष्णू शंकर जैन यांचा हल्लाबोल!

07 Jun 2025 11:38:23

Vishnu Shankar Jain on Congress

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Vishnu Shankar Jain on Congress) मंदिरांसाठी हिंदू पक्षाच्या बाजूने लढणारे वरिष्ठ अधिवक्ता विष्णू शंकर जैन यांनी काँग्रेसच्या दुटप्पी धोरणांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी असा आरोप केला की, सनातन धर्माचे विभाजन करण्यासाठी जैनांना अल्पसंख्याक समुदायाच्या श्रेणीत टाकण्यात आले, परंतु जैनांना त्याचा लाभ कधीच मिळाला नाही. इस्लाम समर्थक समुदायाला मात्र याचा नेहमीच फायदा झाला. आज परिस्थिती अशी बनली आहे की, देशातील इतर अल्पसंख्याकांचे हक्क इस्लामसमर्थकांच्या हक्कांसारखे झाले आहेत.

हे वाचलंत का? : भारत-चीन सीमेलगत लागली संघाची शाखा!



एका कार्यक्रमात जैन समुदायाला संबोधत विष्णू शंकर जैन पुढे म्हणाले, "जैन लोक देशाच्या जीडीपीमध्ये खूप महत्त्वाचे योगदान देतात. त्यामुळे जैनांना अल्पसंख्याक समुदायाचा दर्जा देण्याची गरज नाही. जैन समुदाय हा सनातन धर्माचा अविभाज्य भाग आहे. ४२ व्या घटनादुरुस्तीद्वारे कोणत्याही चर्चेशिवाय धर्मनिरपेक्षता हा शब्द संविधानात जोडण्यात आला.

Powered By Sangraha 9.0