मुंबईकरांनो सावधान! पुढील ३ ते ४ तासांत जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

07 Jun 2025 16:18:46
 
Rain
 
मुंबई : मुंबईतील अनेक भागांत मुसळधार पाऊस बरसला असून पुढील ३ ते ४ तास वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पुढच्या काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
 
दादर, वरळी, परळ, कुर्ला, सायन यासह अनेक भागांत जोरदार पाऊस पडत आहे. दरम्यान, आता पुढील काही तासांसाठी हवामान विभागाने मुंबईसाठी अलर्ट जारी केला आहे. पुढील ३ ते ४ तासांत जिल्हांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणइ ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह जोरदास ते अतिशय तीव्र पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
 
हे वाचलंत का? -  "रोज खोटे बोलले की..."; राहुल गांधींच्या आक्षेपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
 
तसेच मुंबईकरांना घराबाहेर न पडण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. कल्याण, डोंबिवली, पवई, चेंबूर आणि आसपासच्या भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणातही पावसाचा जोर वाढ असून मध्य माहाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0