मुंबई : 7 जून रोजी ईद निमित्त नमाज अदा करण्यासाठी ऑगस्ट क्रांती मैदान या ऐतिहासिक स्थळी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे प्रतीक असलेल्या या ठिकाणाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता, मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना सदर मागणी फेटाळण्याची विनंती केली आहे.
“हे केवळ एक मैदान नाही, तर आपल्या स्वातंत्र्यलढ्याचं जिवंत प्रतीक आहे. या पवित्र स्थळी अशा कार्यक्रमांना परवानगी देणं म्हणजे त्या वारशाचा अवमान होय. अशा प्रकारची याचिका करणे हीच लाजीरवाणी गोष्ट आहे आणि ती मान्य करण्याचा प्रश्नच येत नाही” असे मंत्री लोढा यांनी एक्स या समाजमाध्यमाद्वारे स्पष्ट केले.