बांगलादेशात निवडणुका जाहीर; आवामी लीग लढू शकणार नाही?

07 Jun 2025 17:36:16

Elections in Bangladesh

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Elections in Bangladesh)
बांगलादेशात झालेल्या सत्तांतरानंतर सध्याचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनुस यांचे सरकार आले. जवळजवळ वर्षभर याठिकाणी अस्थिरतेचा काळ सुरू असल्याचे दिसतेय. अंतरिम सरकारवर नाराज झालेली बांगलादेशातील जनता, राजकीय पक्ष आणि लष्कर यांनी हळूहळू मोहम्मद युनूसवर निवडणुका घेण्यासाठी दबावतंत्र सुरु केले. अखेर या मागणीपुढे ते झुकले आणि बांगलादेशात निवडणुका घेण्याची घोषणा केली. एप्रिल २०२६ दरम्यान बांदलादेशात निवडणुका होणार आहेत.

हे वाचलंत का? : पाकिस्तानात अहमदिया मुस्लिमांना ईद साजरी करण्यास बंदी!


माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार उलथवून टाकण्यात आल्यानंतर बांगलादेशात खूप हिंसक निदर्शने झाली होती. या संपूर्ण बंडानंतर बांगलादेशात ही पहिलीच निवडणूक होणार आहे. शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीग निवडणुकीत भाग घेऊ शकेल का असा सध्या प्रश्न आहे. कारण गेल्या महिन्यात युनूस सरकारने आवामी लीगवर बंदी घातली होती. ही कारवाई दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत करण्यात आल्याची माहिती आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणात पक्ष आणि त्यांच्या नेत्यांविरुद्ध सुरू असलेली सुनावणी पूर्ण होईपर्यंत अवामी लीगवरील ही बंदी कायम राहील, असे सांगण्यात येते आहे.
Powered By Sangraha 9.0