ज्येष्ठ समाजसेवक विजय कडणे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार' जाहीर

06 Jun 2025 13:24:42
 
Vijay Kadane
 
मुंबई : जेष्ठ समाजसेवक विजय कडणे यांना यंदाचा 'बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार' जाहीर झाला आहे. दरम्यान, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी गुरुवार, ५ जून रोजी त्यांना पत्र लिहित त्यांचे अभिनंदन केले आहे.
 
"सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी सामाजिक न्याय विभागाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केले जाते. यावर्षीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासाठी आपली निवड झाल्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन. आपले कार्य नेहमीच समाजाला दिशादर्शक ठरले असून आपण हाती घेतलेल्या कामामुळे समाजातील अनेक लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल झालेला आहे, याबद्दल आपले विशेष आभार," अशा शब्दांत मंत्री संजय शिरसाट यांनी विजय कडणे यांना शुभेच्छा दिल्या.
  
"आपणास दिला जाणारा पुरस्कार हा केवळ एक सन्मान नसून आपण समाजातील उपेक्षित, वंचित आणि दुर्बल घटकांसाठी दिलेल्या आजपर्यंतच्या योगदानाची ही पावती आहे. यापुढेही आपले कार्य असेच अविरतपणे सुरु राहील आणि समाजातील युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल याची मला खात्री वाटते," असेही मंत्री संजय शिरसाट म्हणाले.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0