महावितरण भांडूप परिमंडलात वसुंधरा दिवस उत्साहाने साजरा
- दृढ निश्चय करून काम केले तर निश्चितच यशस्वी व्हाल – परेश भागवत
06-Jun-2025
Total Views |
मुंबई: महावितरणच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ‘शुन्य अपघात महावितरण, शुन्य अपघात महाराष्ट्र’ ही संकल्पना घेऊन दि. १ ते ६ जून २०२५ या कालावधीत संपूर्ण राज्यात विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. आज दि. ५ जून २०२५ रोजी वसुंधरा दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
वसुंधरा दिवसाचा औचित्य साधून पर्यावरणपुरक उपक्रम म्हणून वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर, कर्मचाऱ्यांची रॅली काढण्यात आली. यावेळी मुख्य अतिथी म्हणून, कार्यकारी संचालक परेश भागवत, भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता, संजय पाटील, मुख्य महाव्यवस्थापक (मा सं) भूषण कुलकर्णी, महाव्यवस्थापक राजेंद्र पांडे व इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महावितरण मध्ये राज्यभर आज वसुंधरा दिवस साजरा करण्यात आला . वसुंधरा दिवस हा पर्यावरणविषयक कार्यक्रमांना पाठबळ देण्यासाठी एक पाया आहे. कार्यकारी संचालक (मा सं) परेश भागवत व भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता, संजय पाटील यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाबाबत माहिती दिली. त्यानंतर, कर्मचारी /अधिकाऱ्यांची रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून वीज सुरक्षा व वीज बचत बाबत जनजागृती करण्यात आली. त्यानंतर,नेरूळ विभागातील कर्मचाऱ्यांनी नेरूळ रेल्वे स्थानक जवळ एक सुंदर पथनाट्य सादर केले. या पथनाट्यद्वारे त्यांनी विजेपासून होणारे अपघात कसे टाळावे व त्यातून संरक्षण कसे करावे याबद्दल माहिती दिली.
महावितरणचा कणा असलेले महावितरणचे कर्मचारीवर्ग महावितरणसाठी खूप महत्वाचे आहेत याचा एक प्रमाण म्हणून महावितरण वाशी मंडळातर्फे दिव्यांग कर्मचाऱ्यांना मॉडिफाइड स्कूटर देण्यात आल्या. जेणेकरून त्यांचा दैनंदिन प्रवास थोडा अधिक सोयीस्कर होण्यास मदत होईल. “विजेपासून सुरक्षा हे प्रत्येक कर्मचाऱ्यांची स्वतःची जबाबदारी आहे . आपल्यासाठी व आपल्या कुटुंबासाठी सुरक्षा बाळगून काम करणे आवश्यक आहे . आपण जर दृढ निश्चय करून काम केले तर नक्कीच यशस्वी होऊ”, असे महावितरणचे कार्यकारी संचालक (मा सं ) परेश भागवत यांनी सांगितले.
“रोजच्या कामातून काही वेगळी संकल्पना मुख्य कार्यालयांनी या सुरक्षा साप्ताहच्या माध्यमातून मांडली आहे . अशा कार्यक्रमामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना एक नवीन उर्जा मिळते. परंतु, कर्मचाऱ्यांनी हे लक्षात घेणे गरजेचे आहे कि आपल्या दैनंदिन कामात सुरक्षा विषयक मुलभूत गोष्टींचा सराव करणे आवश्यक आहे”, असे भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता संजय पाटील यांनी सांगितले. या कार्यक्रमाला यशस्वीपणे पार पडण्यासाठी वाशी मंडळाचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील व मंडळातील सर्व कार्यकारी अभियंता व त्यांच्या चमूनी विशेष मेहनत घेतली. याशिवाय, ठाणे व पेण मंडळात अधीक्षक अभियंता युवराज मेश्राम व धनराज बिक्कड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे मंडळात बाईक रॅलीचे आयोजन करून सुरक्षा विषयी जनजागृती करण्यात आली.