लक्षद्वीपने शालेय अभ्यासक्रमातून अरबी आणि महाल भाषा वगळल्या; हिंदीला प्राधान्य?

05 Jun 2025 18:14:19

lakshadweep education policy

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (lakshadweep education policy) 
केंद्रशासित प्रदेश असलेल्या लक्षद्वीपने त्यांच्या शालेय अभ्यासक्रमातून अरबी आणि महाल भाषा काढून टाकल्याचे निदर्शनास येतेय. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. इथल्या शाळांमधील मुले आता अरबी आणि महाल भाषेऐवजी हिंदी शिकतील अशी माहिती आहे. मात्र इथल्या इस्लाम समर्थकांनी याला तीव्र विरोध केला आहे.

हे वाचलंत का? : सैतानालाही लाजवेल असे भयंकर कृत्य; उपचाराच्या नावाखाली काढल्या २५ जणांच्या किडण्या?

मधल्या काळात लक्षद्वीपमध्ये इस्लामच्या आगमनाने अरबी भाषेचा प्रभाव वाढला. येथील धार्मिक शिक्षणातही अरबी भाषेचा वापर केला जात असे. शालेय अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात आलेली महाल भाषा मालदीवमध्ये बोलली जाते. मालदीवमध्ये याला धाहेवी असेही म्हणतात. केरळमधील कम्युनिस्ट सरकारचे मंत्री व्ही शिवनकुट्टी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. हा निर्णय घटनात्मकदृष्ट्या चुकीचा असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Powered By Sangraha 9.0