शर्मिष्ठा पनौलीला जामीन मंजूर; तक्रारदार वजाहत खानचे काय?

05 Jun 2025 15:58:02

Sharmistha Panoli bail by Calcutta Highcourt

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Sharmistha Panoli bail)
सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर आणि कायद्याची विद्यार्थीनी शर्मिष्ठा पनौली हिला कोलकाता पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. अखेर गुरुवार, दि. ५ जून रोजी दहा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर कोलकाता उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. ऑपरेशन सिंदूरशी संबंधित बनवलेल्या एका व्हिडिओमध्ये 'इस्लामविरोधी' टिप्पणी केल्याच्या आरोपाखाली तिला पश्चिम बंगाल पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले होते. मात्र याचदरम्यान तक्रारदार वजाहत खान स्वतः फरार झाल्याने प्रकरण आणखी गुंतागुंतीचे झाले.
 
हे वाचलंत का? : शर्मिष्ठाला तुरुंगात जीवे मारण्याच्या धमक्या! मूलभूत सुविधाही नाकारल्या; वकिलांकडून न्यायालयात याचिका दाखल
 
वास्तविक शर्मिष्ठाने तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून तो व्हिडिओ काढूनही टाकला आणि तिने जाहीरपणे माफीसुद्धा मागितली होती. तरीही भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांतर्गत तिला ताब्यात घेतले होते. १३ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती, मात्र आता तिला जामीन मंजून झाला आहे.

कोलकता उच्च न्यायालयात ट्रायल कोर्टाने दिलेल्या कोठडीच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. सुनावणीदरम्यान, शर्मिष्ठाच्या वकिलाने म्हटले होते की एफआयआरमध्ये नमूद केलेले सर्व गुन्हे अदखलपात्र असल्याने तिची अटक बेकायदेशीर आहे. नवीन कायद्यानुसार हे अनिवार्य असले तरी, अटकेपूर्वी त्याला कोणतीही सूचना देण्यात आली नव्हती. याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती म्हणाले की, शर्मिष्ठाच्या कथित कृतींवर पुढील कोणतेही खटले दाखल होणार नाहीत याची खात्री राज्य करेल.

तक्रारदार वजाहत खान अद्यापही फरार असून आसाम पोलीस त्याच्या शोधात आहेत. वजाहत खान विरुद्ध एकूण २७ एफआयआर दाखल झाले आहेत. आपल्या सोशल मिडिया पोस्टमधून त्याने हिंदू समुदायाला लक्ष्य करणारे द्वेषपूर्ण भाषण पोस्ट केले होते, ज्यामध्ये हिंदू सण, देवता आणि मंदिरांवर अपमानास्पद टिप्पणी होती. त्यासोबतच त्याने पानोलीच्या अटकेची मागणी करणाऱ्या पोस्टही लिहिली होती.


Powered By Sangraha 9.0