सैतानालाही लाजवेल असे भयंकर कृत्य; उपचाराच्या नावाखाली काढल्या २५ जणांच्या किडण्या?

05 Jun 2025 17:18:38

Pakistan kidney news

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Pakistan Kidney Removed News)
पाकिस्तानाच्या सादिकाबादमधून एक धक्कादायक घटना उघडकीस येतेय. किडनी स्टोनवरील उपचाराच्या नावाखाली गावातील २५ मुलांच्या किडन्या काढून टाकण्यात आल्याचा दावा केला जातोय. यासंबंधित एक व्हिडिओदेखील सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही लहान-लहान मुलेही दिसतायत. अद्याप या व्हिडिओबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

हे वाचलंत का? : शर्मिष्ठा पनौलीला जामीन मंजूर; तक्रारदार वजाहत खानचे काय?



मिळालेल्या माहितीनुसार, गावकऱ्यांना असे सांगण्यात आले होते, की त्यांना किडनी स्टोन असून वेळीच ऑपरेशन आवश्यक आहे. यानंतर, उपचारादरम्यान त्यांची किडणी काढून टाकण्यात आली. स्वस्त उपचार देण्याच्या नावाखाली त्यांची फसवणूक करण्यात आल्याचे कळतेय. रुग्ण शुद्धीवर आले तेव्हा त्यांना हा प्रकार लक्षात आला. स्थानिक माध्यमांनी ही माहिती दिली असून प्रशासनाकडून याबाबत अधिकृत माहिती अद्याप पुरवलेली नाही.

Powered By Sangraha 9.0