मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Hindu Studies Centre Admission) मुंबई विद्यापीठाच्या हिंदू अध्ययन केंद्रातर्फे २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पारंपरिक हिंदू विचार, संस्कृती, संगीत आणि मंदिर व्यवस्थापन यांसारख्या विषयांत गाढा अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक अनोखी शैक्षणिक संधी उपलब्ध झाली आहे.
एम.ए. इन हिंदू स्टडीज, पी.जी. डिप्लोमा इन टेम्पल मॅनेजमेंट, एम.ए. कीर्तनशास्त्र या विषयातील अभ्यासक्रमांसाठी प्रवेश खुला आहे. कोणत्याही शाखेतील पदवी अभ्यासक्रमांसाठी पात्र आहे. त्यामुळे विज्ञान, वाणिज्य, कला, व्यवस्थापन इत्यादी कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.
प्रवेश प्रक्रियेसाठी इच्छुकांनी www.mu.ac.in किंवा muadmission.samarth.edu.in या संकेतस्थळांवर भेट देऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. अधिक माहितीसाठी संपर्क : 9833154121, 9821347961, 9870370170
या अभ्यासक्रमांचे वर्ग रामकृष्ण बजाज भवन, मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथे भरवले जाणार आहेत. पारंपरिक भारतीय अध्यात्मिक शिक्षण प्रणाली व आधुनिक शैक्षणिक दृष्टिकोन यांचा समन्वय साधणारे हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना केवळ ज्ञानच नव्हे तर करिअरच्या दृष्टीनेही एक नवीन दिशा देणारे ठरणार आहेत.