हेमराज बागुल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

05 Jun 2025 12:03:34
Hemraj Bagul


मुंबई 
: माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (प्रशासन) हेमराज बागुल यांचा गुरुवार, दि. ५ जून रोजी वाढदिवस आहे. बागुल हे प्रशासनातील एक अनुभवी आणि कार्यतत्पर अधिकारी म्हणून परिचित आहेत. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना आणि धोरणांच्या जनजागृतीमध्ये त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे.

शांत, सौम्य स्वभाव, निर्णयक्षम नेतृत्व आणि प्रामाणिक कार्यपद्धती ही त्यांच्या नेतृत्वगुणांची वैशिष्ट्ये. माहिती आणि जनसंपर्क विभागातील अंतर्गत कामकाज, व्यवस्थापन, कर्मचारी प्रशिक्षण, वित्तीय शिस्त आणि वेळेचे नियोजन यामध्ये त्यांनी उल्लेखनीय सुधारणा घडवून आणल्या आहेत. ई-गव्हर्नन्स, डिजिटायझेशन आणि सोशल मीडियाचा वापर करत जनतेपर्यंत शासनाचे संदेश पोहोचवण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
Powered By Sangraha 9.0