आम्ही तिघेही तीन शिफ्टमध्ये गाडी चालवतो! समृद्धी महामार्गावर प्रवास करतेवेळी मुख्यमंत्री फडणवीसांची मिश्कील प्रतिक्रिया

05 Jun 2025 14:50:37
 
Devendra Fadanvis
 
मुंबई : समृद्धी महामार्गाच्या आमने ते इगतपुरी या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. गुरुवार, ५ जून रोजी हा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता.
 
दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या नव्या महामार्गावरून एकत्रित प्रवास केला. सुरुवातीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्टेअरिंग हाती घेत गाडी चालवली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या बाजूला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मागच्या सीटवर बसले होते.
 
हे वाचलंत का? -  "त्यांची इच्छा असल्यास त्यांनी..."; ठाकरे बंधू एकत्र येण्यावर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया
 
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आम्ही तिघेही एकत्रित गाडी चालवतो आहोत, काही काळजी करू नका. आम्ही तीन शिफ्टचे ड्रायव्हर आहोत. आम्हाला एकमेकांच्या गाडीत बसण्याची आणि ड्रायव्हिंगची सवय आहे. आमची गाडी अगदी छान सुरु असून आम्ही तिघेही तीन शिफ्टमध्ये गाडी चालवतो आहोत. आता गाडी मी चालवणार आहे. त्यामुळे नंतर आम्ही दोघे बरोबर गाडी चालवतो की, नाही ते तुम्ही अजितदादांना विचारा," असेही ते माध्यम प्रतिनिधींना म्हणाले.
 
त्यानंतर इगतपुरीच्या दिशेने प्रवास करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाडीचे स्टेअरिंग हाती घेत गाडी चालवली. अजित पवार हे मागे बसले होते. इगतपूरी ते आमने असा हा ७६ किलोमीटर लांबीचा महामार्ग आहे. या लोकार्पण सोहळ्यानंतर लवकरच सर्वसामान्य नागरिकांसाठी वाहतूकीसाठी हा रस्ता खुला केला जाणार आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0