संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली! मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली माहिती

04 Jun 2025 16:24:06

parliament monsoon session from july 21 to august 12
 
नवी दिल्ली : (Parliament Monsoon Session 2025) संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी दि. ४ जून रोजी दिली आहे. २१ जुलै ते १२ ऑगस्ट या दरम्यान संसदेचे हे पावसाळी अधिवेशन असणार आहे. या अधिवेशनाच्या काळात संसदेच्या दोन्ही सभागृहात देशातील विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
 
हे वाचलंत का? -  पाकसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली एका पंजाबी युट्यूबरला अटक! ज्योती मल्होत्रा - दानिशसोबत कनेक्शन
 
अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर चर्चा
 
विरोधकांकडून सातत्याने ऑपरेशन सिंदूरवर विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी होत होती. मात्र, आता पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरवर विशेष अधिवेशन न होता, जी चर्चा होईल ती या पावसाळी अधिवेशनातच होईल. यासंदर्भात रिजिजू म्हणाले, "अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर चर्चा केली जाईल. प्रत्येक अधिवेशन हे विशेष असते. आम्ही ऑपरेशन सिंदूरसह सर्व मुद्द्यांवर चर्चा करू, सरकारला सर्वांना सोबत घेऊन चालायचे आहे. आम्ही विरोधकांशी याबाबत चर्चा केली आहे, आशा आहे की, या बाबतीत सर्वजण एकसारखी भूमिका घेतील."
 
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय कामकाज समितीने पावसाळी अधिवेशनाच्या संदर्भातील तारखांबाबत निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0