नवी मुंबई, खारघर पूर्वमधील तळोजा हा दक्षिण नवी मुंबईतील वेगाने विकसित होणारा नोड असून, पायाभूत सुविधा आणि विकास यामुळे त्याचे भरभराटीच्या केंद्रात रूपांतरण होत आहे. खारघर, पनवेल, कल्याण आणि डोंबिवली जवळ मोक्याच्या ठिकाणी स्थित असलेला तळोजा नोड आधुनिक सुविधा, कनेक्टिव्हिटी आणि परवडणाऱ्या किमतीचे एक अद्वितीय मिश्रण देतो, ज्यामुळे रहिवासी आणि व्यवसायांसाठी हे एक आकर्षक ठिकाण बनले आहे. सिडकोने विकसित करत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सान्निध्यामुळे तळोजा नोडचे महत्त्व अधिकच अधोरेखित होत आहे.
सुधारित पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक संधींमुळे तळोजा (खारघर पूर्व) हे नवी मुंबईसाठी एक प्रमुख विकास इंजिन बनण्यास सज्ज आहे. या नोडचा सातत्याने विकास होत राहिल्याने, ते रहिवासी व व्यवसाय यांना उत्कृष्ट संधी प्रदान करून विविध प्रकारच्या गुंतवणूकदारांना आकर्षित करेल अशी अपेक्षा आहे. या सर्वांच्या परिपूर्ण मिश्रणामुळे, तळोजा नोड हा नवी मुंबईतील राहण्यासाठी, काम करण्यासाठी आणि गुंतवणूक करण्यासाठी इच्छुकांसाठी एक आकर्षक नोड बनेल यात कोणतीही शंका नाही, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.
पायाभूत सुविधा विकास आणि नवी मुंबई मेट्रो
शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) तळोजाच्या रस्ते, पूल, सार्वजनिक सुविधा आणि नवी मुंबई मेट्रोसह पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. या विकासामुळे नोडची मागणी अजूनच वाढेल व ते राहण्यासाठी आणि गुंतवणूकीसाठी एक लोकप्रिय ठिकाण बनेल. आगामी प्रकल्पांसह तळोजाची कनेक्टिव्हिटी लक्षणीयरीत्या सुधारण्यासाठी सज्ज आहे. कल्याण-डोंबिवली-तळोजा मेट्रो मार्ग म्हणूनही ओळखली जाणारा मेट्रो १२ हा मार्ग कल्याण ते तळोजा यांना जोडेल. या मार्गामुळे प्रवासाचा वेळ अंदाजे ४५ मिनिटांनी कमी करेल. मुंबई मेट्रो लाईन १२ एक मेट्रो लाईन आहे असून तळोजा नोडसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. खारघर-तुर्भे बोगदा रस्ता प्रकल्प या मह्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे खारघर आणि तुर्भे दरम्यान थेट कनेक्टिव्हिटी स्थापित होईल. विद्यमान नवी मुंबई मेट्रो मार्ग १ हा मेट्रो मार्ग सीबीडी बेलापूरला थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करतो. तळोजा ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि एमटीएचएल (अटल सेतू) हे अंतर अंदाजे ३० मिनिटे इतके आहे.
नव्या पुलांची बांधणी
खारघर आणि तळोजा दरम्यान कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी, पेंढर आरओबी आणि तळोजा नदी पूल हे दोन प्रमुख पूल पूर्णत्वाच्या जवळ आहेत. पेंढर आरओबीमध्ये पादचाऱ्यांसाठी एक समर्पित फूट ओव्हर ब्रिज आहे, ज्यामध्ये पुढील तीन ठिकाणी मोक्याच्या ठिकाणी लँडिंग आहे. खारघर आणि तळोजा दिशेकडील दोन्ही मार्गांसह तळोजा नदी पुलाचे बांधकाम सुरू आहे. तळोजा दिशेचा मार्ग पूर्ण झाल्यानंतर, पेंढर आरओबी वाहतुकीसाठी खुला केला जाईल, ज्यामुळे वाहनांना राष्ट्रीय महामार्ग -०४ ला थेट प्रवेश मिळेल आणि रेल्वे लेव्हल क्रॉसिंगची आवश्यकता राहणार नाही. दोन्ही पूल पूर्ण झाल्यानंतर, खारघर आणि तळोजा दरम्यान अखंड कनेक्टिव्हिटी स्थापित होईल.
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील तळोजा नोडचे धोरणात्मक स्थान त्याच्या विकासात क्रांती घडवून आणण्यास सज्ज आहे. त्याचबरोबर रहिवासी आणि व्यवसायासाठी अतुलनीय कनेक्टिव्हिटी आणि विकासाच्या संधी प्रदान करत आहे. तळोजा ते सीबीडी बेलापूर यांना अखंडपणे जोडणारी नवी मुंबई मेट्रो लाईन १ एक जीवनरेखा म्हणून प्रस्थापित झाली आहे. शिवाय, पूर्णत्वास साकारणारा खारघर-तळोजा पूल प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी करेल व एकंदरीतच राहणीमानाचा दर्जा देखील वाढवेल."
- विजय सिंघल, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, सिडको