हेरगिरीच्या प्रकरणात पाकचा गुप्तहेर हसीनला अटक!

04 Jun 2025 18:22:41
 
Pakistan spy hasin arest
 
जयपूर: राजस्थानमधून अटक केलेल्या हसीनला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. हसीनला पाकिस्तानसाठी हेरगिरी आणि डीआरडीओ अधिकाऱ्यांना हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली पटियाला हाऊस कोर्टाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
 
या प्रकरणात, दिल्ली पोलिसांनी न्यायालयाला सांगितले होते की, "हसीनकडून जप्त केलेल्या मोबाईलमधील सिम कार्ड हे भारतीय कंपनीचे म्हणजे भारतातील आहे आणि त्या सिमचा वापर हा पाकिस्तानमधून केला जात आहे. हसीनच्या या भारतीय सिम नंबरवर व्हॉट्सअॅप चालवून डीआरडीओ आणि भारतीय मिलिटरी इंटेलिजेंसच्या लोकांना हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला जात होता. म्हणून, हसीनला ताब्यात देण्यात यावे जेणेकरून पोलीस योग्य ती चौकशी करू शकतील व चौकशीअंती सर्व सत्य उघड होईल."
 
हसीनच्या या भारतीय सिम नंबरवर डीआरडीओचे अधिकारी असलेले अमित कुमार यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला जात होता. हे सिम हसीनच्या नावाशी जोडलेले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार हे सिम कार्ड एका पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्याला देण्यात आले होते. ज्या सिमच्या माध्यमातून हनी ट्रॅपचा प्रयत्न केला जात होता.
 
आता या प्रकरणी पोलिसांच्या स्पेशल सेलने सांगितले की, आम्हाला इतर आरोपींसोबत हसीनची समोरासमोर चौकशी करायची आहे आणि तपास पुढे न्यायचा आहे. पोलिसांनी असेही म्हटले की, ''तपास अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि तो अतिशय संवेदनशील आहे. म्हणून हसीनला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी.'' पोलीसांच्या मागणीनुसार पटियाला हाऊस कोर्टाने हसीनला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0