मुंबई : उबाठा गटाचे सांगलीतील नेते चंद्रहार पाटील हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. दरम्यान, आता चंद्रहार पाटील यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर याबद्दल पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून चंद्रहार पाटील उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. दरम्यान, बुधवारी मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांच्या पक्षप्रवेशाची तारीख जाहीर केली. येत्या सोमवारी चंद्रहार पाटील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हे वाचलंत का? - हकालपट्टीनंतर सुधाकर बडगुजर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
मात्र, याबद्दल बोलताना चंद्रहार पाटील म्हणाले की, "माझ्या पक्षप्रवेशाच्या बाबतीत मी अधिकृत भूमिका घेतली नाही. शिवसेना शिंदे गटाकडून पक्ष प्रवेशाबाबत मला ऑफर आहे. पक्षप्रवेश करायचा, पक्ष सोडायचा याबाबतचा निर्णय अजून घेतला नाही. सध्या मी बाहेर गावी असून माझ्या सहकाऱ्यांसोबत बोलून पुढील निर्णय घेईन," असे ते म्हणाले.