RCBच्या विजयी मिरवणुकीला गालबोट! चिन्नास्वामी स्टेडियमबाहेरील चेंगराचेंगरीत ७ जणांचा मृत्यू

04 Jun 2025 18:07:37

7 people died in rally of RCB


बंगळुरू : बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या आयपीएल २०२५ विजयी मिरवणुकीला गालबोट लावणारी घटना घडली आहे. मिरवणुकीपूर्वी चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत ७ जणांचा मृत्यू झाला आणि २५ हून अधिक जण जखमी झाले आहेत.

मंगळवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पंजाब किंग्सवर ६ धावांनी विजय मिळवत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने पहिल्यांदाच आयपीएलचे विजेतेपद पटकावले. या ऐतिहासिक यशानंतर बुधवारी बंगळुरूमध्ये विजय मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.स्टेडियमबाहेर हजारो चाहत्यांची गर्दी जमली होती. ही गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत एका बालकासह ७ जणांचा मृत्यू झाला. जखमींना तातडीने बोरिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी मिरवणूक तात्काळ थांबवली. सुरक्षा कारणास्तव बसमधील मिरवणूक रद्द करण्यात आली आहे . त्याऐवजी, खेळाडूंचा सत्कार विधानसभेमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या दुर्घटनेमुळे आरसीबीच्या विजयाचा आनंदावर दुःखाचे सावट पसरले आहे. चाहत्यांच्या सुरक्षेसाठी अधिक चांगल्या नियोजनाची आवश्यकता असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.
Powered By Sangraha 9.0