राजेश कुमार यांनी स्वीकारला मुख्य सचिवपदाचा कार्यभार

30 Jun 2025 22:32:12

मुंबई,
 राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांनी मंगळवारी मंत्रालयात मावळत्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून औपचारिकरित्या पदभार स्वीकारला.

महाराष्ट्र कॅडरचे १९८८ बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या कुमार यांनी यापूर्वी विविध खात्यांमध्ये महत्त्वाची प्रशासकीय जबाबदारी सांभाळली असून, प्रशासनातील त्यांचा अनुभव व्यापक आहे. सुजाता सौनिक यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असतानाच, राज्य सरकारने राजेश कुमार यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती केली.

पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी परिचयात्मक बैठक घेतली आणि प्रशासनात पारदर्शकता, कार्यक्षमतेवर भर देण्याचा आपला प्रयत्न राहील, असे सांगितले. राज्याच्या प्रशासनाचे सर्वोच्च पद म्हणून मुख्य सचिवपद अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, तसेच धोरणात्मक निर्णयांच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने, कुमार यांच्या कार्यकाळाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.



Powered By Sangraha 9.0