नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे जखमा दिल्या. तसेच, अनेक प्रकारचे निर्बंध लावून पाकिस्तानला गुडघे टेकण्यास भाग पाडले. भारताने पाकिस्तानातून येणार्या मालासोबतच माल घेऊन जाणार्या जहाजांनाही आपल्या बंदरांवर प्रवेशबंदी केली असून यामुळे शिपिंगचा खर्च वाढला आहे आणि मालवाहतुकीतही विलंब होत आहे.
पाकिस्तानी वृत्तपत्र ‘डॉन’ने रविवार, दि. २९ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे की, पाकिस्तानी आयातदार म्हणतात की, "भारतीय निर्बंधांमुळे शिपिंगचा वेळ वाढला आहे आणि मालवाहतूक शुल्कही वाढले आहे. ‘कराची चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री’चे अध्यक्ष जावेद बिलवानी म्हणाले, "भारताच्या या कारवाईमुळे मुख्य जहाजे पाकिस्तानात येत नाहीत. यामुळे आमच्या आयातीला ३० ते ५० दिवसांचा विलंब होत आहे.”
विमा खर्चातही वाढ
बिलवानी म्हणाले की, "आयातदार आता फीडर जहाजांवर अवलंबून राहत आहेत, ज्यामुळे खर्च वाढत आहे. भारताने निर्बंध लावल्यानंतर शिपिंग आणि विमा खर्चातही वाढ झाली आहे. तथापि, निर्यातीवर एकूण परिणाम नगण्य आहे.” ‘टेसटाईल मेड-अप्स’चे निर्यातदार अमीर अझीझ म्हणाले, "विमा खर्चात वाढ वगळता निर्यातीवर कोणताही विशेष परिणाम झालेला नाही. शिपिंग खर्च आधीच वाढला होता.”
बांगलादेशातून येणार्या ‘ज्यूट’वर भारतात बंदी
युनूस सरकार सत्तेत असलेल्या बांगलादेशावर भारताने व्यापारी निर्बंध लादले आहेत. बांगलादेशावर लादलेल्या आयात बंदीनंतर तब्बल एक हजार, २०० कोटींहून अधिकचा फटका बसला आहे. त्यातच आता भारताने बांगलादेशातून येणार्या ‘ज्यूट’वर बंदी घातली आहे. याचा परिणाम बांगलादेशच्या निर्यातीवर मोठ्या प्रमाणात होण्याची शयता आहे. भारताने बांगलादेशातून येणार्या अनेक उत्पादनांच्या आयातीवर आधीच बंदी घातली आहे. भारताकडून कापड, पेये त्यानंतर आता ‘ज्यूट’ आयातीवर बंदी घातल्याची माहिती आहे.