इराणी मौलानाचा ट्रम्प-नेतान्याहू विरोधात फतवा

    30-Jun-2025   
Total Views |

मुंबई : इराणी शिया मौलाना नासेर मकारेम शिराजी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या विरोधात एक वादग्रस्त फतवा काढला आहेत. यामध्ये दोन्ही प्रमुखांना अल्लाहचे शत्रू म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यासोबतच त्यांनी साऱ्या जगाला अमेरिका आणि इस्रायलविरुद्ध एकत्र येण्याचे आवाहन केल्याचेही दिसते आहे.

नासेर मकारेम शिराजी यांनी आपल्या फतव्याद्वारे इशारा दिला की, जर कोणी सरकार किंवा जागतिक इस्लामिक समुदायाविरुद्ध कट रचला तर त्याला योग्य उत्तर दिले जाईल. हे अल्लाहचा अपमान मानले जाईल आणि ते अल्लाहविरुद्ध युद्ध मानले जाईल. जगभरातील मुस्लिमांनी अल्लाहच्या शत्रूंना ओळखण्याची आणि पूर्ण ताकदीने बदला घेण्याची गरज आहे. इराणच्या सर्वोच्च नेत्याची हत्या करण्याची योजना आखणाऱ्यांना इस्लामिक कायद्यानुसार शिक्षा दिली जाईल.

अलिकडेच इस्रायलने इराणला अण्वस्त्रे मिळवण्यापासून रोखण्यासाठी त्याच्या अण्वस्त्र स्थळांवर हल्ला केला होता. यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू झाले. १२ दिवसांच्या युद्धानंतर युद्धबंदी जाहीर करण्यात आली. मात्र, इराणने असा दावा केला की इस्रायल एका आठवड्यात पुन्हा हल्ला करेल. त्यानंतर अशाप्रकारचा फतवा दोन्ही राष्ट्रांच्या प्रमुखांविरोधात काढण्यात आला.



ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक