आदिवासी समाजाच्या अनुदानाचा उपयोग समाजाच्या आर्थिक समक्षमिकरणासाठी व्हावा: आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके

30 Jun 2025 21:37:21

पुणे : महिला बचत गट शेतकरी गट तसेच वैयक्तिक पातळीवर उद्योग व व्यवसाय उभारणीसाठी अदिवासी विभागातर्फे आर्थिक सहाय दिले जाते. या अनुदानाचा उपयोग रोजगारनिर्मितीसाठी व आदिवासी समाजाच्या आर्थिक सक्षिमीकरणासाठी व्हावा यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी केले. नुकतीच त्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आदिवासी विकास विभागाची आढावा बैठक घेतली यावेळी ते बोलत होते. यावेळी आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील आदिवासी शासकीय आश्रमशाळातील विद्यार्थ्यांच्या वैदयकिय तपासणी निदान व प्रतिबंधनात्मक उपचारांसाठी संचालक केईम हॉस्पिटल संशोधन केंद्र पुणे व प्रकल्प अधिकारी घोडेगाव यांच्यातील निशुल्क सामंजस्य कराराचे प्रारंभ डॉ उईके यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटिल आ उमा खापरे आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लिना बनसोड विभागिय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटिल आदिवासी विकास विभागावे अप्पर आयुक्त गोपिचंद कदम घोडेगाव एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी प्रदिप देसाई उपस्थित होते




Powered By Sangraha 9.0