मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी निवड करण्यात आली आहे. सोमवार, ३० जून रोजी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईतील महिला विकास मंडळाच्या सभागृहात दुपारी २ वाजता शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांची पुन्हा एकदा मुख्य नेतेपदी नियूक्ती करण्यात आली आहे. तसेच या बैठकीत इतरही अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर दोन गट निर्माण झाले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निर्णय देत पक्षाचे नाव आणि चिन्ह त्यांच्याकडे सोपवले. त्यानंतर शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदेंची नियूक्ती करण्यात आली. त्यानंतर आता पुन्हा एकदा आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंची मुख्य नेतेपदी नियूक्ती करण्यात आली आहे. तसेच शाखाप्रमुखापासून तर मुख्य नेत्यापर्यंत सर्वांनाच निवडणुकीला सामोरे जावे लागणार असल्याचे यावेळी त्यांनी यावेळी सांगितले.