रशियाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला...; हवाई हल्ल्यात युक्रेनचे एफ-१६ सुपरसॉनिक विमान पाडले!

    30-Jun-2025
Total Views |

Russia
 
मॅास्को : तीन वर्षांपासून सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध दिवसेंदिवस अधिकच तीव्र होताना दिसून येत आहे. रशियाने आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला करत, युक्रेनचे एफ-१६ सुपरसॉनिक लढाऊ विमान विमान पाडले आहे. रविवार दि. २९ जून रोजी रात्री झालेल्या युद्धात रशियाने हा हल्ला केल्याची माहिती उघड झाली आहे. या दरम्यान, रशियाने युक्रेनवर ५३७ हवाई शस्त्रांचा मारा करत, ४७७ ड्रोन आणि ६० क्षेपणास्त्रे डागली.
 
युक्रेन हवाई दलाचे प्रमुख युरीय इह्नात यांनी या हल्ल्याबाबत माहिती देताना सांगितले की, "रशियाचा आतार्पंयतचा हा सर्वात मोठा हल्ला आहे. या हल्ल्यात एका लहान मुलासह सहा निष्पाप युक्रेनीयन नागरीक जखमी झाले आहेत." तीन वर्षापासून सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध अहवालाचा दाखला देत युक्रेन हवाई दलाचे प्रमुख युरीय इह्नात यांनी रशियाकडून तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा एफ-१६ विमानाचे नुकसान झाल्याचे यावेळी स्पष्ट केले.
 
आमच्या प्रत्येक जीवनावश्यक गोष्टीवर लक्ष करणारा हल्ला : झेलेन्स्की
 
युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी ट्विट करत म्हटले कि, आमची संपूर्ण रात्र भीतीच्या छायेत गेली, युक्रेनमध्ये संपूर्ण रात्रभर रेड अलर्ट सायरन वाजत होते. रशियाचे एकुण 477 ड्रोन आणि 60 प्रकारांची क्षेपणास्त्रांचा आमच्या दिशेने मारा होत होता. ड्रोन हल्ल्यातील बहुतेक ड्रोन हे ‘शाहेद ड्रोन’ होते. रशियाचा हा हल्ला आमच्या प्रत्येक जीवनावश्यक गोष्टीवर लक्ष करणारा होता. असे झेलेस्की म्हणाले.