तेलंगणात रिॲक्टरचा स्फोट; १२ जणांचा मृत्यू

    30-Jun-2025
Total Views |
 
Reactor explosion in Telangana; 12 people killed
 
तेलंगणा : संगारेड्डी जिल्ह्यातील केमिकल बनवणाऱ्या एका कारखान्यातील रिॲक्टरच्या स्फोटात एकूण होरपळून १२ जणांचा मृत्यू झाला. संगारेड्डीतील सिगा केमिकल फार्मा कंपनीत ही घटना घडली. आगीची भीषणता लक्षात घेत बचावकार्यासाठी ११ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी तैनात करण्यात आल्या होत्या. या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अपघातावेळी एकूण ६५ कर्मचारी तिथे कार्यरत होते.
 
बचावकार्यात १४ जखमींना वाचवण्यात यश
 
सिगा केमिकल फार्मा कंपनीतील रिॲक्टरच्या स्फोटातील मृतांचा आकडा वाढत आहे. परंतू अग्निशमन दलाच्या जवानांनी राबवलेल्या बचावकार्यात जवळपास १४ जखमींना वाचवण्यात यश आले आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती तेलंगणा अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
 
दरम्यान झालेल्या स्फोटाबाबत बोलताना संगारेड्डीचे पोलिस अधीक्षक परितोष पंकज म्हणाले की, "आम्ही राबवलेल्या शोध मोहीमत आतापर्यंत पोलिस प्रशासनाला कोणताही मृतदेह मिळालेला नाही, शोध आणि बचाव कार्य अजून सुरू आहे."