इस्रायलचे पॅलेस्टिनींना उत्तर गाझा खाली कराण्याचे आदेश!
30-Jun-2025
Total Views |
तेहरान : इस्त्रायल-इराण युद्धबंदीनंतर इस्त्रायलने आपला मोर्चा हमासकडे वळवला आहे. इस्त्रायली सैन्याने रविवार, दि. २९ जून रोजी पॅलेस्टिनींना उत्तर गाझातील रहिवासी क्षेत्रे खाली करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, इस्रायली लष्कराने आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, "इस्रायली लष्कर आखलेल्या मोहीमांच्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्याच्या जवळ आहे. युद्ध विस्ताराच्या पाश्वभुमीवर उत्तर गाझा हे आमचे लक्ष आहे, म्हणूनच उत्तर गाझातील पॅलेस्टिनींनी त्यांची रहिवासी क्षेत्रे तात्काळ खाली करावी, अन्यथा त्यांना नुकसान होऊ शकते." असे इस्रायल लष्कराने सांगितले.
उत्तर गाझातील जबालिया परिसर आणि बहुतेक जिल्ह्यांमध्ये पॅलेस्टिनींना त्यांची रहिवासी क्षेत्रे खाली करण्याचे आदेश इस्रायलचे आहेत. यापुर्वी इस्रायलने केलेल्या बॉम्बहल्ल्यांत गाझातील अनेक घरे उद्ध्वस्त झाली होती. आणि सहा पॅलेस्टिनी ठार झाले होते. तर तिथे दक्षिण गाझातील खान युनिस भागातील हवाई हल्ल्यात पाच पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला होता. गाझा आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत ५६,००० हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत, इस्त्रायलच्या सततच्या हल्ल्याने हमासमधील जवळपास २३ लाख लोकसंख्या विस्थापित झाली आहे.