भारताच्या हवाई हल्ल्यात पाकचे मोठे नुकसान; उपग्रह प्रतिमांमध्ये सत्य स्पष्ट

03 Jun 2025 15:13:43
 
Pakistan suffers heavy losses in Indian airstrike Satellite images reveal truth
 
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने केलेल्या हवाई हल्यात पाकिस्तानचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भारत-पाकच्या चार दिवसांच्या हल्ल्याच्या चकमकीतील ५० वर्षातील ही सर्वात मोठी लढाई होती. युद्धात दोन्ही देशांनी एकमेकांच्या हवाई हल्ल्याच्या क्षमतेची परीक्षा घेत एकमेकांच्या लष्करी तळांवर हल्ला केला. परंतु आता उपग्रह प्रतिमांमध्ये सत्य स्पष्ट झाले आहे.
 
युद्धादरम्यान, हल्ल्यांसाठी दोन्ही देशांनकङून क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा वापर करण्यात आला. दोन्हीही देशांनी एकमेकांना जास्तीत जास्त नुकसान पोहोचवल्याचा दावा केला. परंतु आता उपग्रह प्रतिमांमध्ये असे दिसून आले की, झालेले हल्ले हे असंख्य होते. आणि यातील बहुसंख्य हल्ले हे भारताने पाकिस्तानी तळांवर केले होते. हे सत्य उपग्रह प्रतिमांमध्ये स्पष्ट झाले आहे.
 
पाकच्या भोलारी एअरबेसवरील उपग्रह प्रतिमा, असे स्पष्ट दाखवतात की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने केलेल्या हवाई हल्यात पाकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पाकच्या हँगरवर आता दुरुस्तीचे काम चालू आहे. उपग्रह प्रतिमांमध्ये हल्यांआधी व हल्ल्यानंतरच्या हाय रिझोल्यूशनच्या प्रतिमांवरून असे दिसून येत आहे की, भारताच्या हवाई हल्यांत पाकिस्तानी लष्करी तळांचे मोठे नुकसान झाले आहे.
 
इंटेल लॅबमधील भू-गुप्तचर संशोधक डेमियन सायमन यांनी आपल्या एक्स सोशल मीडीयावर ही उपग्रह प्रतिमा पोस्ट केली आहे. ज्यात भोलारी एअरबेसवरील हँगरवर दुरुस्तीचे काम चालू आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे. पाकच्या भोलारी एअरबेसवरून मिळालेल्या उपग्रहांच्या प्रतिमांवरून असे दिसून येते की, भारताच्या हवाई हल्ल्यात पाकचे नुकसान झालेले हँगर आता ताडपत्रीने झाकून ठेवले आहेत, याआधी कावा स्पेसने पाकच्या भोलारी बेसचे बॉम्ब हल्यात नुकसान झालेल्या प्रतिमा शेअर केल्या होत्या. ज्यात पाकच्या हँगरवर दृश्यमान परिणाम दिसून येत होता.
 
कराचीपासून १०० किमीपेक्षा कमी अंतरावर स्थित, भोलारी हा पाकचा नवीन एअरबेसपैकी एक आहे. जो की, पाकने नौदल आणि हवाई या दोन्ही युद्ध कारवाईकरता बनवला आहे. पाकच्या इतर असलेल्या नूर खान व रफीकी एअरबेसपैकी भारतीय हवाई दलाने लक्ष्य केलेल्या विशेष एअरबेसपैकी हा एक होता.
 
भारताने केलेल्या हवाई हल्यात पाक एअरबेसच्या तटीय संरक्षण क्षमतांना अक्षरक्ष: कमकुवत केले आहे. पाककडून करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने १० मे रोजी ११ पाकिस्तानी हवाई तळांवर प्रत्युत्तरात्मक हवाई हल्ले केले होते.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0