गांधीनगर : अहमदाबादमध्ये २०२५ आयपीएल हंगामाचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. बंगळुरू विरुद्ध पंजाब, असा हा अंतिम सामना असणार आहे. या संपूर्ण सिझनच्या पारितोषिक वितरण समारंभाला किती बक्षीस असणार याबद्दल सर्वांना उत्सुकता असणार आहे. आयपीएलच्या एकूण लीगच्या बक्षीसाची रक्कम तब्बल ४७ कोटी रुपये इतकी आहे. आरसीबी विरुद्ध पंजाब किंग्ज इलेवन या दोघापैंकी कोण चॅंपियन ठरत याकडे सर्व क्रिकेटप्रेंमीच लक्ष लागले आहे.
मंगळवार, ३ जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीयम अंतिम सामन्यासाठी सज्ज आहे. आता या अंतिम सामन्यात कोणता संघ २०२५ आयपीएलच्या या हंगामाची ट्रॉफी घेऊन जातो आणि तब्बल २० कोटी रुपयांचे मोठे बक्षीस आपल्या नावे करतो हे पाहण्यासारखे ठरेल. तर आयपीएल २०२५ च्या उपविजेत्या संघाला १३ कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.
बीसीसीआयने २०२५ आयपीएल हंगामात मोठ्या प्रमाणातील बक्षीस रक्कम ठेवली आहे. ज्यामध्ये टी-२० क्रिकेट विश्वातील आयपीएलचे जागतिक स्तरावरचे स्थान स्पष्ट होते. २०२५ आयपीएल हंगामात एकूण बक्षीस रक्कम तब्बल ४७ कोटी रुपये एवढी आहे. जी रक्कम पहीले अव्वल असलेले चार संघ आणि वैयक्तिक पुरस्कार विजेत्यांमध्ये विभागून दिली जाणार आहे.
असे होणार २०२५ आयपीएल हंगामातील बक्षीसांचे वाटप -
चॅम्पियन संघ- ₹२० कोटी
उपविजेता संघ- ₹१३.५ कोटी
तिसऱ्या स्थानावरील संघ- ₹७ कोटी
चौथ्या स्थानावरील संघ- ₹६.५ कोटी
या संघाच्या बक्षीसा व्यतिरिक्त, वैयक्तिकरीत्या खेळाडूंना त्यांच्या कामगिरीसाठी मिळणारी बक्षीसे -
ऑरेंज कॅप खेळाडू (सर्वाधिक धावा): ₹१० लाख
पर्पल कॅप खेळाडू (सर्वाधिक विकेट्स): ₹१० लाख
सर्वाधिक मूल्यवान खेळाडू (MVP): ₹१० लाख
हंगामातील सुपर स्ट्रायकर: ₹१० लाख
हंगामातील उदयोन्मुख खेळाडू: ₹१० लाख
फँटसी प्लेअर ऑफ द सीझन: ₹१० लाख
मॅक्सिमम सिक्सेस अवॉर्ड: ₹१० लाखम