मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या ठाण्यातील शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

29 Jun 2025 20:52:50

ठाणे,
मुख्यमंत्री सचिवालय व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्या समन्वयाने मानपाडा येथे आयोजित केलेल्या मोफत सामुदायिक आरोग्य शिबिराला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येऊन आवश्यक रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची स्थापना करण्यात आली असून, या कक्षातर्फे ठाण्यात ठिकठिकाणी शिबिरे घेतली जात आहेत. त्यानुसार मानपाडा येथे आज शिबिर पार पडले. या शिबिराला भाजपाचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष संदीप लेले, माजी गटनेते मनोहर डुंबरे, अर्चना मणेरा, स्नेहा आंब्रे, शहर उपाध्यक्ष रमेश आंब्रे, भाजयुमोचे अध्यक्ष सुरज दळवी, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा स्नेहा पाटील, कोकण पदवीधर प्रकोष्ट संयोजक सचिन मोरे, राम ठाकूर, भाजपाचे मानपाडा मंडल अध्यक्ष जितेंद्र मढवी, ब्रह्रांड-बाळकूम मंडल अध्यक्ष निलेश पाटील, कासारवडवली मंडल अध्यक्षा ज्योती ठाकूर,महेश ताजणे, अपर्णा ताजणे, अर्चना पाटील आदी उपस्थित होते.

या शिबिरात तज्ज्ञ व सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांकडून हृदयरोग, मूत्रपिंड, कान, नाक आणि डोळे, दंत, मणका, हाड, मधुमेह, कर्करोग, बालरोग आणि इतर आजारांबाबत रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच अनेक रुग्णांची रक्त, ईसीजी, मॅमोग्राफी व कर्करोग चाचणी मोफत करण्यात आली. आवश्यक रुग्णांना मुख्यमंत्री निधीतून शस्त्रक्रियांसाठी मदत करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विनामूल्य आयुष्मान भारत कार्डची नोंदणी करण्यात आली. या शिबिरासाठी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.



Powered By Sangraha 9.0