उल्हासनगरात शिवसेना पक्षाची स्थानिक आढावा बैठक संपन्न

29 Jun 2025 19:03:09

उल्हासनगर : महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. यासाठी विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेण्यास सुरुवात केली आहे. त्याच अनुषंगाने उल्हासनगरात शिवसेना पक्षाच्यावतीने उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक उल्हासनगरातील सी ब्लॉक येथील गुरुद्वारा येथे आयोजित करण्यात आली होती.

शिवसेना मुख्यनेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे व आमदार बालाजी किणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक नुकताच संपन्न झाली. या आढावा बैठकीत शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरुण आशान माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र सिंह भुल्लर( महाराज), रमेश चव्हाण, कल्याण लोकसभा सचिव तिरुपती रेड्डी, महिला शहर संघटक मनीषा भानुशाली, माजी नगरसेवक कळवंत सिंह सोहता, युवा सेना उपजिल्हाधिकारी युवराज पाटील, युवा सेना शहर अधिकारी बाळा श्रीखंडे, सुशील पवार, , शिवसेना उपशहर प्रमुख, सुरेश सोनवणे, जयकुमार केनी, गजानन बामणकर, जितू उपाध्याय, संदीप गायकवाड, शिवसेना विभागप्रमुख प्रमोद पांडेय ज्ञानेश्वर मरसाळे, महेंद्र पाटील आधी उपस्थित होते.

येणाऱ्या आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत उल्हासनगरात शिवसेना पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून आणता येतील. या पार्श्वभूमीवर शिवसेना सदस्य नोंदणी, निवडणूक आयोगाचे नियोजन आणि कार्यपद्धती यासंबंधी सखोल चर्चा या बैठकीत करण्यात आली. महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगरात शिवसेना पक्षाच्या दिग्गज नेत्यांची आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचे महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी सांगितले.या आढावा बैठकीत शिवसेनेच्या शिलेदारांनी उपस्थिततांना येणाऱ्या निवडणुकी संदर्भात मार्गदर्शन केले. या बैठकीत शिवसेनेने उल्हासनगरात भगवा फडकवण्याचा संकल्प केला.



Powered By Sangraha 9.0