नवी दिल्ली : भारत आणि बांगलादेश यांच्यातील गंगा नदीच्या पाण्याच्या वाटपावरील १९९६ सालचा करार २०२६ मध्ये संपत आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकार नव्या अटींसह कराराचे पुनरावलोकन करण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
गंगेच्या पाण्याच्या वाटपासाठी १९९६ मध्ये दोन्ही देशांमध्ये करार झाला होता. या करारानुसार दरवर्षी १ जानेवारी ते ३१ मे या कोरड्या हंगामात फरक्का धरणातून पाण्याचे वाटप ठराविक प्रमाणात केले जाते. सदर करारात ११ मार्च ते ११ मे या कालावधीत भारत आणि बांगलादेश यांना आलटून पालटून १० दिवसांच्या कालखंडात प्रत्येकी ३५,००० क्युसेक्स पाणी देण्याची तरतूद आहे. १९७५ मध्ये फरक्का धरण कार्यरत झाल्यानंतर भारताने हुगळी नदीकडे पाणी वळवले होते, ज्यामुळे बांगलादेशमध्ये पाण्याची टंचाई जाणवू लागली. त्या पार्श्वभूमीवर हा करार करण्यात आला होता. ज्यास आता ३० वर्ष पूर्ण झाली आहेत.
भारत सध्या आपल्या वाढत्या विकासात्मक गरजा आणि जलव्यवस्थापनाच्या दृष्टीने नव्या पर्यायांचा विचार करत आहे. हवामान बदल, गंगेच्या प्रवाहातील घट यासारखे घटक लक्षात घेऊन हा निर्णय घेतला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. करारात बदल करणासाठी दोन्ही देशांची संमती आवश्यक आहे. त्यामुळे पुढील काळात भारत आणि बांगलादेश यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. गंगा जलवाटप कराराचा कार्यकाल २०२६ मध्ये संपणार भारत नव्या अटींसह करारावर पुनर्विचार करू शकतो भारत आणि बांगलादेश यांच्यात गंगेच्या पाण्याच्या वाटपासाठी १९९६ मध्ये झालेला करार २०२६ मध्ये ३० वर्षे पूर्ण करून संपनार आहे. या कराराच्या नूतनीकरणासाठी दोन्ही देशांची सहमती आवश्यक आहे. मात्र भारत सध्याच्या विकासात्मक गरजा लक्षात घेता नव्या अटींसह करार करण्याचा विचार करत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
या करारामागे नेमके कारण काय?
हा करार त्या वेळी करण्यात आला होता, जेव्हा शेख हसीना बांगलादेशच्या पंतप्रधानपदावर प्रथमच विराजमान झाल्या होत्या. करारानुसार, पश्चिम बंगालमधील फरक्का धरणातून गंगेचे पाणी कोरड्या हंगामात म्हणजेच १ जानेवारी ते ३१ मे या काळात दोन्ही देशांमध्ये ठराविक प्रमाणात वाटण्यात येते.हा करार मुख्यतः फरक्का धरणावर आधारित असून, गंगेच्या प्रवाहाचे नियमन आणि वाटप यासाठी एक चौकट प्रदान करतो. पुढील काळात कराराचा विस्तार, बदल किंवा नवा करार होणार का, हे भारत आणि बांगलादेशमधील चर्चांनंतर स्पष्ट होईल. भारत आणि बांगलादेश यांच्यातील गंगा जलवाटप करार १९९६ मध्ये झाल्याचं कारण म्हणजे फरक्का धरणामुळे निर्माण झालेला वाद. १९७५ साली हे धरण तयार झाल्यानंतर गंगेचे पाणी हुगळी नदीकडे वळवण्यात आले, जेणेकरून कोलकाता बंदर चालू राहावे.
या धरणाच्या माध्यमातून सुमारे ४०,००० क्युसेक्स पाणी एका फीडर कॅनालमधून कोलकाता पोर्ट ट्रस्टपर्यंत वळवण्यात येते. यामुळे बांगलादेशमध्ये गंगेच्या प्रवाहात घट झाल्याचा आरोप बांगलादेशमार्फत करण्यात येत आहे.याच वादावर तोडगा काढण्यासाठी १९९६ मध्ये दोन्ही देशांमध्ये करार झाला. भारत हा उजव्या प्रवाहातील तर बांगलादेश खालच्या प्रवाहातील देश आहे. या पार्श्वभूमीवर फरक्का धरणाजवळील गंगेच्या पाण्याचे वाटप कसे करावे यासाठी अटी ठरवण्यात आल्या.सध्याच्या अटींनुसार, ११ मार्च ते ११ मे या काळात दोन्ही देशांना ३५,००० क्युसेक्स पाणी आलटून पालटून १० दिवसांच्या कालावधीसाठी दिले जाते.