विदर्भ वारकरी महर्षी गुरू ह.भ.प.नारायण महाराज तराळे यांचे वैकुंठागमन

28 Jun 2025 20:03:42

मुंबई : वारकरी संप्रदायातील जेष्ठ व्यक्तिमत्व गुरू ह.भ.प.नारायण महाराज तराळे यांचे वयाच्या ९८ वर्षी निधन झाले. वारकरी कुटुंबात १९२८ रोजी जन्मलेल्या तराळे महाराजांचे शिक्षण ७ वी पर्यंतच झाले होते. मात्र वयाच्या १३ व्या वर्षापासून महाराजांनी वारकरी संप्रदायाच्या सेवेशी एकनिष्ठपणे शेवटपर्यंत अविरत सेवा केली. त्यांना वारकरी परंपरेतील अनेक थोर संत मंडळींचा सहवास लाभला होता. ते मूळचे अकोला येथील व्याळा गावचे रहिवासी होते.

तराळे महाराजांनी वै .पांडूरंग महाराज दिंडी सोहळा श्री क्षेत्र पंढरपुर आणि श्री क्षेत्र मुक्ताई नगर तब्बल ६० वर्ष समर्थपणे सांभाळला होता. त्यांनी आपले संपूर्ण जीवन वारकरी संप्रदायाच्या प्रचार आणि प्रसारासाठी निस्वार्थपणे समर्पित केले होते. महाराज यांच्या जाण्याने फार मोठी पोकळी निर्मान झाली. त्यांनी निर्माण केलेली विरह अभंग मालिका प्रसिद्ध आहे. त्यांच्या अफाट कार्यासाठी अनेक पुरस्कारांनी देखील त्यांनी सन्मानित करण्यात आले आहे. नारायण महाराज यांच्या पश्यात दोन मुले, मुली, जावई, स्नुषा, नातू आणि पणती आहेत. महाराज यांची परंपरा त्यांचे मोठे चिरंजीव ह.भ.प. निवृत्ती महाराज तराळे हे त्याच नियमाने सांभाळत आहेत.

Powered By Sangraha 9.0