नवी मुंबईत आज स्वयंपुनर्विकास मार्गदर्शन शिबीर

28 Jun 2025 18:52:11

मुंबई
: खासगी विकासकाच्या भरवश्यावर न राहता स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून जुन्या इमारतींचा पुनर्विकास करता यावा यासाठी स्वयंपुनर्विकास कृती समिती, नवी मुंबईतर्फे आज, रविवार दि. २९ जून रोजी सकाळी १०.३० वाजता स्वयंपुनर्विकास विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या मार्गदर्शन शिबिराला भाजपा विधान परिषद गटनेते, मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि स्वयंपुनर्विकासाचे शिल्पकार आमदार प्रविण दरेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

स्वयंपुनर्विकासाचे हे मार्गदर्शन शिबीर समाज मंदिर हॉल, डी मार्टच्या मागे, नवी मुंबई महानगर पालिका शाळेजवळ,भू. क्र. १०, सेक्टर ७, घणसोली, नवी मुंबई येथे पार पडणार आहे. ‘हो हे खरंय...तुमच्या राहत्या घरापेक्षा तीनपट मोठे घर तुम्हाला मिळू शकते.’ हे समजून घेण्यासाठी नागरिकांनी या स्वयंपुनर्विकास मार्गदर्शन शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वयंपुनर्विकास कृती समिती, नवी मुंबईने केले आहे.

Powered By Sangraha 9.0