मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश अध्यक्षपदाच्या तसेच राष्ट्रीय परिषद सदस्य निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार रविवार दि. २९ जून रोजी पक्षाच्या राज्य परिषद सदस्यांची घोषणा करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय परिषद सदस्य निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे.
प्रदेश अध्यक्ष पदासाठी सोमवार, दि. ३० जून रोजी भाजप प्रदेश कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. दुपारी ३ ते ५ या वेळात हे अर्ज दाखल करता येतील. १ जुलै रोजी सकाळी १० वाजता प्रदेश अध्यक्षांच्या आणि राष्ट्रीय परिषद सदस्यांच्या निवडीची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती प्रदेश निवडणूक अधिकारी आ. चैनसुख संचेती यांनी दिली आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय निवडणूक प्रक्रियेअंतर्गत प्रदेश अध्यक्ष आणि राष्ट्रीय परिषदेच्या सदस्यांच्या निवडणुकीसाठी तीन राज्यांमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यासाठी केंद्रीय मंत्री . किरेन रिजिजू यांची यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती शुक्रवार, दि. २७ जून रोजी याबाबतची घोषणा करण्यात आली.