मुंबई : 'यू कान्ट सी मी' म्हणत तरुणाईच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या WWE चा दिग्गज चॅम्पियन रेसलर जॉन सीनाने अखेर आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. तत्पूर्वी आयुष्यातील शेवटचा सामना डिसेंबर २०२५ च्या मध्यात खेळणार असल्याचे त्याने जाहीर केले. हेड्स ऑफ स्टेट या त्याच्या नवीन चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान त्याने निवृत्तीची घोषणा केली.
चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान जॉन सीना म्हणाला की, "कोडी रोड्सकडून मी WWE चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर माझे स्वप्न पुर्ण झाले. या सामन्याने WWE चा निर्विवाद चॅम्पियन म्हणून मला ओळख मिळाली. त्या सामन्याचे विजयी क्षण मी शेवटपर्यंत विसरू शकत नाही. आता मी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या आयुष्यातील शेवटचा सामना डिसेंबर २०२५ च्या मध्यात खेळून मी निवृत्त होईन. यावेळी मी ४८ वर्षांचा असेल"
चाहत्यांसाठी हा भावनिक क्षण -
जगभरात WWE मोठा चाहतावर्ग आहे. यात चॅम्पियन राहिलेल्या जॉन सीनाला फॉलो करणाऱ्यांची देखील मोठी संख्या आहे. WWE ला सीनाने खूप काही दिले, त्याचे योगदान नेहमीच लक्षात ठेवले जाईल, सीनाचा हा निवृत्ती प्रवास त्याच्या चाहत्यांसाठी खूप भावनिक असणार आहे. आयुष्यातील शेवटचा सामना जिंकून सीना खरा चॅम्पियन ठरतो का? याकडे चाहत्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.