मुंबई : स्वतः घेतलेल्या निर्णयावरच उबाठा गटाचं रडगाणं सुरु आहे. उद्धवजी किती युटर्न घेणार? असा सवाल भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंनी हिंदी सक्तीविरोधात मोर्चा काढण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
नवनाथ बन म्हणाले की, "उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना फेब्रुवारी २०२२ मध्ये त्यांनी ‘NEP’ टास्क फोर्सचा अहवाल अधिकृतपणे स्वीकारला. त्या अहवालात स्पष्टपणे लिहिले आहे की, इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा धोरण लागू करावे आणि हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवावी हेही मान्य केले. मग आता उबाठा गट त्याच धोरणाविरोधात का मोर्चा काढतोय? स्वतः घेतलेल्या निर्णयावर आता स्वतःच रडगाणं गाणं म्हणजे ढोंग नाही का?" असा सवाल त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, "हे आंदोलन नाही तर जनतेची दिशाभूल करण्याची नौटंकी आहे. स्वतः सत्तेत असताना त्रिभाषा धोरण मंजूर करायचं आणि बाहेर पडलात की हिंदी सक्तीचं खोटं रडगाणं गात मोर्चे काढायचे हीच उबाठांची स्टाईल आहे. उद्धवजी किती युटर्न घेणार?" असेही नवनाथ बन म्हणाले.