मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी 'तो' अहवाल का स्वीकारला? केशव उपाध्येंचा सवाल

27 Jun 2025 12:41:29


मुंबई : उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना माशेलकर समितीचा अहवाल का स्वीकारला? असा सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी येत्या ५ जुलै रोजी हिंदी सक्तीच्या विरोधात मुंबईत एकत्रित मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.





केशव उपाध्ये म्हणाले की, "मुळात गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा हा प्रयत्न आहे. यांना मराठी भाषेचे काहीच देणघेणे नाही हे प्रखर वास्तव आहे. जो मुद्दाच नाही त्यावर मोर्चा किती हास्यास्पद आहे. जनतेच्या हे लक्षात येणार नाही का?" असे ते म्हणाले.

"ठाकरे बंधू गैरसमजाचे बळी! राजकारण कराल तर..."; काय म्हणाले मंत्री आशिष शेलार?

साप साप म्हणत भुई ढोपटण्याचे काम सुरू!

"महाराष्ट्रात मराठीची सक्ती आहे हिंदीची सक्ती नाहीच तरी साप साप म्हणत भुई ढोपटण्याचे काम सुरू आहे. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना माशेलकर समितीचा अहवाल का स्वीकारला? त्याचे उत्तर मोर्चा काढण्यापूर्वी उध्दव ठाकरे यांनी द्यायला हवे. याच माशेलकर समितीने त्रिभाषा सुत्राचा आणि हिंदींचा आग्रह धरला होता. महापालिकेच्या मराठी शाळा इंग्रजी करण्याचा घाट आदित्य ठाकरे यांनी घातला होता त्यावेळी मराठी प्रेम कुठे गेलं होतं?" असा सवालही केशव उपाध्ये यांनी केला आहे.






Powered By Sangraha 9.0