मुंबई : जर बँकेत तुमचे काही काम असेल तर आजच करुन घ्या. कारण उद्या शनिवार दि. २८ जून रोजी बँका बंद राहणार आहेत त्याचबरोबर २९ जूनला देखील रविवार आहे. त्यामुळे सलग दोन दिवस बँक बंद राहणार असल्याने बँकेत जाऊन करायची कामांमध्ये अडथळा निर्माण होणार आहे.
२८ जून हा चौथा शनिवार असल्यामुळे बँकांना सुट्टी राहणार आहे. या लागोपाठ सुट्ट्यांमुळे तुमच्या कामात अडथळा येण्याची शक्यता आहे. मात्र जे लोक डिजिटल बँकिंग सेवेचा वापर करतात, त्यांच्या कामांवर या सुट्ट्यांचा कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही आहे. कारण डिजिटल बॅकिंगसेवा सुरूच राहणार आहे.