विद्यार्थ्यांनी 'आम्ही व्यसन करणार नाही' ची घेतली शपथ

26 Jun 2025 16:29:44

कल्याण : कल्याणच्या सम्राट अशोक विद्यालयात दि. 26 जून रोजी जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी भविष्यात आम्ही कधी ही व्यसन करणार नाही अशी शपथ घेतली.

कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साबाजी नाईक व पोलीस हवालदार रूपाली पाटील यांनी अमली पदार्थाचे व्यसन आणि त्याचे दुष्परिणाम याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पोलीस निरीक्षक साबाचे नाईक म्हणाले व्यसन कोणतेही असो शरीराला घातक आहे. व्यसनामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण होते. बाल गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. आपण बाल गुन्हेगार ठरलो तर आपल्याला बाल सुधार गृहात पाठविले जाते. म्हणून भविष्यात व्यसन करू नका आणि करूही देऊ नका असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.

रूपाली पाटील म्हणाल्या व्यसनामुळे आपण विविध आजारांना बळी पडतो. आपले आयुष्य बरबाद होते. त्याचे दुष्परिणाम आपल्या परिवारावर होतात म्हणून अशा घातक गोष्टींपासून लांब राहिलेले बरे. आयुष्यात तुम्ही कधीही व्यसनाधीन होऊ नका असे सांगितले.

Powered By Sangraha 9.0