प्रार्थना सभेच्या नावाखाली धर्मांतरणाचे षडयंत्र

26 Jun 2025 12:34:36

मुंबई : हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यात सत्संगाच्या नावाखाली सामान्य लोकांचे धर्मांतरण होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित ख्रिस्ती प्रार्थना सभा धर्मांतराचे कटकारस्थान असल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केलाय. याप्रकरणी निशेध व्यक्त करत त्यांनी तहसील कार्यालयात त्यांनी निवेदनही दिले आहे.

संघटनांचा आरोप आहे की सत्संगाच्या नावाखाली भोळ्या लोकांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त केले जात आहे, जे देवभूमीच्या श्रद्धेवर धोका आहे. जेव्हा गावकऱ्यांच्या लक्षात आले की संस्था ख्रिश्चन मिशनरीशी संबंधित आहे, तेव्हा त्यांनी कार्यक्रम रद्द केला आणि स्वतःला त्यातून पूर्णपणे वेगळे केले. विशेष म्हणजे, ज्या पादरी अंकुर नरूला यांनी कार्यक्रमासाठी परवानगी मागितली होती, त्यांच्या जालंधरस्थित चर्चवर 2023 मध्ये इनकम टॅक्स विभागाने छापा टाकला होता.

Powered By Sangraha 9.0