"त्या हल्ल्याने युद्ध संपले"; इस्रायल-इराण युद्धाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचे धक्कादायक विधान!

26 Jun 2025 14:25:44


हेग : (Donald Trump at Nato Summit) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी २५ जून रोजी नेदरलँडमध्ये झालेल्या नाटो शिखर परिषदेत इस्रायल आणि इराणमधील युद्धसमाप्तीच्या पार्श्वभूमीवर बोलताना पुन्हा युद्ध परिस्थिती उद्भवल्यास अमेरिकेच्या मध्यस्थीविषयी आणि युद्धात उतरण्याविषयी भाष्य केले.

हेग येथील नाटो शिखर परिषदेत पत्रकार परिषदेत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराणमधील युद्धाच्या समाप्तीच्या निर्णयाचे स्वागत केले. तसेच जर पुन्हा युद्धासारखी परिस्थिती उद्भवली तर अमेरिका पुन्हा एकदा या युद्धात उतरेल, असे सांगितले. पुढे तेहरानच्या अणु बाँम्बनिर्मितीवर अमेरिका आणि इराण पुढील आठवड्यात चर्चा करतील. जर इराणने आपला अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला तर अमेरिका तसे होऊ देणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे लष्करीदृष्ट्या आपण असे करणार नाही, परंतु हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण इराणशी काहीतरी संबंध ठेवू" " असेही त्यांनी सांगितले.

"त्या हल्ल्याने युद्ध संपले"

इस्रायल आणि इराणमधील युद्धसमाप्तीच्या पार्श्वभूमीवर इराणच्या आण्विक तळांवर करण्यात आलेल्या हल्ल्याचा संदर्भ देत ट्रम्प यांनी या हल्ल्याची तुलना दुसऱ्या महायुद्धात जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी शहरांवर केलेल्या अणुबॉम्बस्फोट हल्ल्यांशी केली आहे. अमेरिकेच्या हल्ल्यामुळेच हे युद्ध संपले असे म्हणत "मला हिरोशिमा आणि नागासाकीचे उदाहरण द्यायचे नाही, पण ते मूलतः तेच होते, ज्यामुळे ते युद्ध संपले. यामुळे युद्धाचा अंत झाला."




Powered By Sangraha 9.0