Iran Israel War : युद्धबंदीनंतरही इराणबद्दल धक्कादायक माहिती उघड! अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी केला ‘हा’ दावा

26 Jun 2025 19:14:39
 
Iran Israel War
 
 
वॉशिंग्टन : इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर युद्धबंदीची घोषणा झाली खरी, तसेच अमेरिकेने केलेल्या अणवस्त्रतळांवरील हल्ल्यामुळे अणवस्त्रनिर्मितीचा कार्यक्रमही पूर्णपणे थांबला, असा दावा करण्यात येत होता. खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही युद्धबंदीची घोषणा केली होती. मात्र, हा दावा आता फोल ठरल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अमेरिकन गुप्तचर अहवालात आणखी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
 
गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या अहवालात इराणच्या नतान्झ, इस्फहान, फोर्डोच्या अण्वस्त्रतळांचे नुकसानची पुष्टी करण्यात आली आहे. परंतु ही इराणी अण्वस्त्रतळ ट्रम्प यांच्या दाव्यानुसार पूर्णपणे नष्ट झालेली नाहीत, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
 
इराणच्या अणवस्त्रतळांचा कार्यक्रम पूर्णपणे नष्ट झाला, असा ट्रम्प यांचा दावा होता. मात्र, हा कार्यक्रम काही महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्याचा दावा गुप्तचर यंत्रणांनी केला आहे.
 
अमेरिका इराणला कोणतिही अण्वस्त्रे बनवून देणार नाही, अशी भूमिका अमेरिकेने स्पष्ट केली होती. इस्त्रायल विरुद्ध इराण युद्धात अमेरिकेने इस्त्रायलची साथ दिली. अमेरिकेच्या बदललेल्या भूमिकेचा वेळीच डाव ओळखत इराणने आपल्या अण्वस्त्रे कार्यक्रम सुरू असलेल्या ठिकाणांहून युरेनियमची जागा बदलण्यास सुरवात केली. गुप्तचर अहवालाच्या मते, इराणने आधीच जवळपास ४०० किलो युरेनियमची जागा बदलली होती. भविष्यात इराण पुन्हा आपला अण्वस्त्रे कार्यक्रम सुरू करू शकतो. जर इराणकडून पुन्हा अण्वस्त्रे सुरू करण्यात आली तर इराणवर पुन्हा मोठा हल्ला केला जाईल, अशी प्रतिक्रिया इस्त्रायलने दिली आहे.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0