भास्कर जाधवांच्या स्टेटसची राऊतांनी उडवली खिल्ली! म्हणाले, "इंटरेस्टिंग वाक्य..."

26 Jun 2025 12:51:30
उबाठा गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या व्हॉट्सअप स्टेटसची सध्या जोरदार चर्चा असताना आता संजय राऊतांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. इंटरेस्टिंग वाक्य आहे, असे म्हणत त्यांनी एकप्रकारे भास्कर जाधवांच्या स्टेटसची खिल्ली उडवल्याचे बोलले जात आहे.


मुंबई : उबाठा गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या व्हॉट्सअप स्टेटसची सध्या जोरदार चर्चा असताना आता संजय राऊतांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. इंटरेस्टिंग वाक्य आहे, असे म्हणत त्यांनी एकप्रकारे भास्कर जाधवांच्या स्टेटसची खिल्ली उडवल्याचे बोलले जात आहे.

काय म्हणाले भास्कर जाधव?
"दिवा तेवत असतानाच त्याला तेलाची गरज असते. तो विझल्यानंतर त्यात तेल टाकणे व्यर्थ आहे. याचप्रमाणे वेळीच माणसांची किंमत करा. वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करण्यात अर्थ नाही," असे स्टेटस भास्कर जाधव यांनी आपल्या व्हॉट्सअपला ठेवले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ते पक्षात नाराज असल्याच्या चर्चा उफाळून आल्या आहेत.

दिवा विझल्यावर तेल टाकून काय उपयोग? भास्कर जाधवांच्या स्टेटसने खळबळ; नाराजीच्या चर्चांना उधाण

याविषयी संजय राऊतांना विचारले असता ते म्हणाले की, "चांगली वाक्य आहेत. इंटरेस्टिंग वाक्य आहेत. पूर्वीच्या मराठी साहित्यात अशा अनेक अलंकारयुक्त वाक्य आणि भाषा होत्या. भास्कर जाधव चांगले वाचक आहेत. त्यामुळे त्यांची भाषा अत्यंत वैभवशाली आहे," असे ते म्हणाले. त्यामुळे भास्कर जाधवांची समजूत काढण्याऐवजी राऊतांनी एकप्रकारे त्यांच्या स्टेटसची खिल्ली उडवल्याचे बोलले जात आहे.




Powered By Sangraha 9.0