पतीच्या सहमतीविना तलाक देण्याचा अधिकार मुस्लीम महिलांना आहे : उच्च न्यायालय

25 Jun 2025 19:29:44

तेलंगणा(Right to Khula Talaq): मुस्लिम महिलेला तलाकच्या खुला (तलाक) पध्दतीद्वारे तलाक करण्याचा पूर्ण अधिकार पतीच्या सहमतीविना आहे, असा निर्वाळा तेलंगणा उच्च न्यायालयाने मंगळवार दि. २४ जून रोजी दिला. मोहम्मद आरिफ अली विरुद्ध श्रीमती अफसरुननिसा या खटलात एका मुस्लीम पुरूषाने त्याच्या पत्नीने तलाक घेतल्याच्या संदर्भात उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.

खटल्यात याचिकाकर्ता मोहम्मद आरिफ अली यांनी तलाक संदर्भात कौटूंबिक न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात त्याने आव्हान दिले होते. या प्रकरणाचा विचार करून उच्च न्यायालयाचे न्या. मौसमी भट्टाचार्य आणि न्या. बी. आर. मधुसूदन राव यांच्या खंडपीठाने सुरुवातीला खुलाच्या संकल्पनेवरील कुराणातील वचनांचा अभ्यास केला. या विषयावरील साहित्याचेही निरीक्षणही नोंदवले.

‘कुराणमधील आयत क्रमांक २२८ आणि २२९ मध्ये “कुराण पत्नीला तिच्या पतीसोबतचा विवाह रद्द करण्याचा पूर्ण अधिकार देते. खुलाच्या वैधतेसाठी पतीची संमती ही पूर्वअट नाही,” असे त्यात म्हटले आहे. ‘जर पतीने पत्नीची खुलाची मागणी नाकारली तर इस्लामिक कायद्यात कोणतिही प्रक्रिया लिहून ठेवलेली नाही,’ असे खंडपीठाने नमूद केले.

‘खुला तलाक पध्दतीत पत्नीने पतीला मेहेर देणे किंवा न देणे हा ऐच्छिक विषय आहे. खंडपीठाने म्हटले की, ‘दार-उल-काझा’चे मत केवळ सल्लागार स्वरूपाचे असल्याने विवाह रद्द करण्यावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी पत्नीला ‘दार-उल-काझा’कडून विवाह रद्द करण्याचे प्रमाणपत्र (खुलनामा) घेणे आवश्यक नाही,’ असेही खंडपीठ म्हणाले.

‘पत्नीच्या खुलाच्या मागणीवर निर्णय घेण्यासाठी त्यांच्याकडून खासगी वादासाठी न्यायालयात प्रकरण नेणे, याचा अर्थ असा की मागणी केल्यावर पत्नीचा खुलाचा प्रस्ताव तात्काळ प्रभावी होतो. कुटूंब न्यायालय फक्त पक्षांमधील मतभेद मिटवण्याच्या प्रयत्नात असेल. मात्र, निकाहावेळी दिलेली रक्कम परत करावी की नाही याचा निर्णय संबंधित महिलेलाच घ्यायचा आहे. खुला तलाक पध्दत ही पूर्णताः महिलेच्या निर्णयावर अंवलबून असते. त्यात न्यायालयाची भूमिका केवळ शिक्का मारण्यापुरती आहे.”, असेही खंडपीठाने नमूद केले.

खंडपीठाने पुढे म्हटले की, खुला तलाक पध्दतीत पत्नीने पतीला ‘मेहेर’ देणे किंवा न देणे हा तीचा वैयक्तिक निर्णय आहे. कौटुंबिक न्यायालयाने दिलेला खुला तलाक पध्दतीबाबतचा निर्णय हा मुस्लीम महिलांची दूर्दशा कमी करण्यासाठी आहे.

काय आहे ‘खुला’ तलाक पध्दत?
‘खुला’ म्हणजे इस्लाममधील एक घटस्फोटाची प्रक्रीया आहे. ज्यामध्ये पत्नी तिच्या पतीला घटस्फोट देण्याची विनंती करते. या प्रक्रियेत, पत्नी तिच्या पतीला ‘मेहेर’ किंवा विवाहात लागलेला खर्च देते. या खुला पध्दतीचा ‘कुराण’ आणि ‘हदीस’मध्ये उल्लेख आहे.



Powered By Sangraha 9.0