ओगावा सोसायटीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे काम करावे - बावनकुळे उपयोगिता बदलण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश
25 Jun 2025 21:07:45
मुंबई, नागपूर जिल्ह्यात कामठी येथे ओगावा सोसायटीने ड्रॅगन पँलेस परिसरातील जागेची उपलब्धता बदलण्याबाबत प्रस्ताव सादर केला आहे. तसेच याठिकाणी करण्यात आलेल्या बांधकामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला तपासणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्याऐवजी ओगावा सोसायटीनेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे काम करावे, अशा सूचना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या आहेत.
ओगावा सोसायटीच्या नवीन बांधकाम प्रस्तावाबाबत मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे आणि महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, ओगावा सोसायटीने ड्रँगन पँलेस परिसर विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याठिकाणच्या बांधकामाची तपासणी करण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला अडचणी आहेत. त्यामुळे ओगावा सोसायटीनेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गदर्शक सूूचनांचे पालन करून बांधकाम करावे. तसेच याठिकाणी बांधण्यात येणाऱ्या इमारतीच्या उपयोगिता बदलण्याचा प्रस्तावही देण्यात आला असून नागपूर जिल्हाधिकारी यांनी तो तातडीने तयार करुन पाठवावा. याठिकाणी प्रादेशिक आयुक्त आणि सोसायटी यांनी शासन निर्णयाप्रमाणे काम करावे अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या. मागील दोन वर्षांपासून याबाबत काम सुरु असून ते आता तातडीने मार्गी लावण्याच्या सूचनाही महसूलमंत्र्यांनी दिल्या.