नवी मुंबईतील इमारतींचे भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याचे आवाहन

25 Jun 2025 15:13:08

obtain occupancy certificate for buildings in Navi Mumbai
 
नवी मुंबई : उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्र. 24/2019 व रिट याचिका क्र.13864/2018 मध्ये पारीत केलेल्या आदेशानुसार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र घेतलेल्या परंतू भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त न करता वापर सुरू केलेल्या इमारतींची यादी नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.nmmc.gov.in यावर तसेच महानगरपालिकेची सर्व 8 विभाग कार्यालये याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 
मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी विषयांकित याचिकेत दि.25 ऑक्टोबर 2024 रोजी नवी मुंबई महानगरपा‍लिका कार्यक्षेत्रातील बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र घेतलेल्या परंतू भोगवटा प्रमाणपत्र न घेता वापर सुरू असलेल्या इमारतींची यादी सादर करणेबाबत आदेशीत केलेले आहे. त्यास अनुसरून सर्व विभाग कार्यालयांनी सर्वेक्षण करुन बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र घेतलेल्या परंतू भोगवटा प्रमाणपत्र न घेता वापर सुरू असलेल्या इमारतींचा अहवाल सादर केलेला आहे.
 
त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या अभिलेखातील बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र घेतलेल्या परंतू भोगवटा प्रमाणपत्र न घेता वापर सुरू असलेल्या इमारतींची माहिती प्रसिध्द करण्यात येत आहे. या यादीत नमूद इमारती / सोसायटी यांनी बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र घेऊन, भोगवटा प्रमाणपत्र न घेता, वापर सुरू केला असल्याचे निदर्शनास आलेले आहे. सदरची बाब नियमास धरुन नाही  सबब, सदर यादीत नमूद केलेल्या 2111 इमारती / सोसायटी मधील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र घेतलेल्या सर्व इमारतींना वापर सुरू करण्यापूर्वी भोगवटा प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे.
 
तरी संबंधितांनी भोगवटा प्रमाणपत्र मिळणेबाबतचा प्रस्ताव नगररचना विभागाकडे सादर करुन भोगवटा प्रमाणपत्र घ्यावे. अन्यथा आपणाविरुध्द महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 च्या तरतूदीनुसार पदनिर्देशीत अधिकारी यांचेमार्फत नियमानुसार कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, याची नोंद घ्यावी असे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सूचित करण्यात येत आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0