नवी दिल्ली : आता दहावीच्या परीक्षा वर्षातून दोनदा होणार असल्याची घोषणा केंद्रीय माध्यामिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) बुधवार, दि. २५ जून २०२५ रोजी जाहीर केले आहे. यानुसार, सीबीएसई बोर्डाने जाहीर उल्लेख केल्यानुसार, दहावीच्या परीक्षा फेब्रुवारी आणि मे अशा दोन टप्यात होणार असून, फेब्रुवारीत होणाऱ्या परीक्षा या सर्व विद्यार्थ्यांसाठी अनिर्वाय असणार आहेत.
ही नवीन परीक्षा पद्धत २०२६ या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहे. २०२०मध्ये आखण्यात आलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाचाच (एन.ई.पाी) एक भाग असल्याचे सी.बी.एस.ई बोर्डाने नमूद केले आहे. नवीन परीक्षा पद्धती विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी आखण्यात आली असून, आता इयत्ता १० वीचे एकाच वर्षात दोन वेळा दहावीची परीक्षा देऊ शकतात. फेब्रुवारीत होणाऱ्या परीक्षेचा निकाल एप्रिल महीन्यात तर मे महिन्याचा निकाल जून महिन्यात लागणार आहे. नवीन परीक्षा पद्धतीनुसार, ज्या विद्यार्थ्याना पहिल्या अनिर्वाय परीक्षेत कमी गुण मिळतील वा तिन विषयात अनुत्तीर्ण होतील, ते विद्यार्थी मे महिन्यात पुन्हा परीक्षा देऊ शकतात.