छत्रपती संभाजीनगर अपघात : कार दुभाजकाला धडकून तीघे ठार, दोन जखमी

25 Jun 2025 15:06:41


छत्रपती संभाजीनगर : प्रचंड वेगाने आलेले वाहन दुभाजकाला धडकल्याने झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंबरी तालुक्यातील बिल्दा गावात मंगळवार, दि. २३ जून रोजी रात्री ११ वाजता ही घटना उघडकीस आली. दुर्घटनाग्रस्त वाहनात पाच मित्र वेगात वाहन चालवत होते. यावेळी कार दुभाजकाला धडकली. पाच पैकी तिघे जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी अवस्थेत होते. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तरुण स्थानिक असून घरी जात होते. त्यांच्या वाहनाचा वेग नियंत्रणाबाहेर गेला होता. यामुळेच कार दुभाजकाला धडकली. सईद मारूफ (१८ वर्ष), अर्फत बागवान (२० वर्ष) आणि रेहान सईद, अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. इतर दोघांवर सध्या उपचार सुरू आहेत.





Powered By Sangraha 9.0