
शोषित-वंचित समाजाचे आपणच मसिहा म्हणत, मिरवणार्या चंद्रशेखर आझाद उर्फ रावणाविरोधात एका महिलेने लैंगिक शोषणाची तक्रार केली. तिच्या तक्रारीची दखल ‘राष्ट्रीय महिला आयोगा’नेही घेतली. सावित्रीची लेक असणार्या मुलीवर अत्याचार झाला, तरीसुद्धा तमाम विरोधी पक्ष तोंडात मूग गिळून बसला आहे. ‘पिछडा समाज’, ‘अगडा समाज’ वगैरे म्हणणारे राहुल गांधी आणि त्यांचे समविचारी तरी गप्प आहेत. खरे तर हिंदू समाज, धर्म यांवर अविरत गरळ ओकणारा चंद्रशेखर फक्त नावानेच ‘रावण’ नाही, तर खरोखरचाच दुर्जन ‘रावण’ आहे, असे दिसते.
काही लोक म्हणतात की, चंद्रशेखर खासदार आहे म्हणून त्याच्यावर आरोप केले आहेत, तर डॉ. रोहिणीने स्पष्ट केले की, चंद्रशेखरने तिला भेट म्हणून कधी एक फुलसुद्धा दिले नाही. चंद्रशेखर याने खासदार होण्यापूर्वी खूप आधी ‘भीम आर्मी’ नावाची संघटना काढली. या माध्यमातून समाजामध्ये उच्च-नीच वगैरे जातीय दरी कशी निर्माण होईल, यासाठी प्रयत्न करत राहिला. अशातच २०१९ साली त्याची भेट रोहिणी घावरी या अतिशय हुशार मुलीशी झाली. भारत सरकारने तिला उच्च शिक्षणासाठी एक कोटी रुपये स्कॉलरशिप दिली होती. ‘पीएच.डी’साठी ती स्वित्झर्लंडला गेली. त्याचकाळात तिची ओळख आणि पुढे चंद्रशेखरसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र, चंद्रशेखरने या मुलीला सांगितले नाही की, तो आधीच विवाहित होता. त्याने रोहिणीलाही लग्नाचे आश्वासन दिलेे. या काळात अविवाहित असल्याचे भासवून चंद्रशेखरने अनेक वेळा तिचे लैंगिक शोषण केले. पण, पुढे चंद्रशेखरला नेतेपदाचे वेध लागले, तेव्हा त्याने रोहिणीशी संबंध तोडले. चंद्रशेखर असे का करतो, याचा मागोवा घेताना रोहिणीला कळले की, तो आधीच विवाहित आहे. तसेच, या आधी तिच्यासारख्याच दोन मुलींचे त्याने लैंगिक शोषण केले होते. त्यामुळे रोहिणीने चंद्रशेखरला न्यायालयात खेचले. असो. रोहिणी जेव्हा परदेशात शिकायला गेली, तेव्हा समाजातील लाखो मुलींनी स्वप्न पाहिले असेल की, आपणही असेच उच्चशिक्षित व्हावे. मात्र, चंद्रशेखरने रोहिणीच्या केलेल्या फसवणुकीमुळे या लाखो मुलींची स्वप्न पूर्ण होण्याआधीच मेली. चंद्रशेखर उर्फ रावणासारखे लोक हे समाजाच्या जिवावर मोठे होतात. पण, समाजालाच वाळवीसारखे पोखरतात. चंद्रशेखर उर्फ रावणाला शिक्षा व्हायलाच हवी.
वाहतूक पोलीस?कतेच लातूरमध्ये वाहतूक पोलीस महिला हवालदारने वाहतुकीचा नियम तोडला, म्हणून तीन महाविद्यालयीन मुलींना अपशब्द वापरले, मारहाण केली. पण, या तीन मुलींना अपशब्द वापरण्याचा, मारहाण करण्याचा अधिकार या पोलीस हवालदाराला आहे का? तसेच, नुकतेच कल्याणमध्ये एका वाहतूक पोलिसाला मारहाण करण्याची घटनाही घडली. अशा घटना का होत आहेत?
अवाढव्य लोकसंख्या आणि वाहनतळाचा अभाव, त्याचबरोबर रस्त्यावर वाहनांची गर्दी आणि बहुतांश बेशिस्त वाहनचालक, त्यातच सगळ्यांनाच सगळ्यात आधी वाहन पुढे दामटवण्याची घाई, यामुळे चौकाचौकात स्वयंचलित सिग्नल यंत्रणा असो की, वाहतूक पोलीस तैनात असोत, चौकात रस्त्यात गर्दीगोंधळ व्हायचा तो होतोच. त्यामुळेच वाहनचालकांनी नागरिकांनी वाहतुकीचे मूलभूत नियम पाळावेत, हे गरजेचेच आहे. जर हे नियम तोडले गेले, तर त्यासाठी कायदेशीर दंड आहे. पण, त्यापलीकडे जाऊन वाहतूक पोलीस किंवा वाहनचालकांनी एकमेकांशी हुज्जत घालणे, मारामार्या करणे, हे सगळे सगळ्यांसाठीच त्रासदायक आहे. यावर काही लोकांचे म्हणणे आहे की, अनेकदा वाहतूक पोलिसांना वाटते की, आपण पोशाख घातला म्हणून ‘सिंघम’ आहोत, तर काही वाहनचालकांना वाटते की, आपल्याकडे वाहन आहे म्हणजे, आपण विशेष आहोत आणि सगळ्या जगाला ठोकर मारून पुढे जाऊ शकतो. वाहतूक पोलिसांचा आणि वाहनचालकांच्या परिस्थितीचा मागोवा घेतला, तर आढळेल की, हे लोक न्युनगंड, दडपण आणि कोणत्यातरी दुःखाचे बळी किंवा भ्रष्टाचारात लिप्त असतात. याचा संताप कुठे काढायचा, तर आपल्या कार्यक्षेत्रात जे समोर येतील त्यांच्यावर. दुसरीकडे रक्तदाब, मधुमेह, थॉयराईड आणि अशाच तत्सम आजारांचा विळखा समाजावर वाढत चालला आहे. यातून वाहतूक पोलीसही सुटले नसणारच. या आजारांमुळे रागावर नियंत्रण ठेवणे अशक्य होते. त्यातूनच मग मनाविरुद्ध घडले की, शिवीगाळ आणि मारामारी होण्याचे प्रसंग घडत आहेत. नेहमी वाटते की, ज्या यंत्रणांचा संबंध जनतेशी येतो, तेथील कर्मचार्यांची शारीरिक आणि मानसिक आरोग्याची तपासणी वेळोवेळी करणे गरजेचे आहे.