“आगीने झालेली जखम बरी होऊ शकते, परंतु जिभेने झालेली जखम बरी होत नाही”; सर्वोच्च न्यायालयाने वजाहत खानला फटकारले!

24 Jun 2025 19:42:57

नवी दिल्ली(Wajahat Khan): वजाहत खान यांने सोशल मीडियावर हिंदू धर्म आणि त्याच्या देवतांबद्दल अपमानजनक केलेल्या पोस्टवर सर्वोच्च न्यायालयांनी सोमवार,दि.२३ जून रोजी दखल घेतली आहे. अनेक राज्यामध्ये वजाहत खान विरूद्ध एफआयआर नोंदविल्या गेल्या होत्या. या सर्व एफआयआर एकत्र करण्याची विनंती खानच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयासमोर केली असता खान यांच्या अटकेला तुर्तास स्थगिती दिली आणि सर्व एफआयआर एकत्र करण्याच्या संबधात केंद्र सरकार आणि राज्य सरकारांकडून उत्तर मागितले.

वजाहत खानवर द्वेष आणि सांप्रदायिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर केल्याच्या आरोपाखाली विविध राज्यांमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याने या अगोदर शर्मिष्ठा पानोली या हिंदू महिलेविरूद्धात तक्रार दाखल केली होती, त्यात ममता बॅनर्जी सरकारने पानोली यांना लगेच अटक केली होती. पण खानवर ममता सरकार मेहरबान होती. ममता सरकारवर टिकेची झोड होत असताना त्याला पश्चिम बंगाल पोलिसने शेवटी अटक केले आहे. आता तो पोलिस कोठडीत आहे आणि दुसऱ्या एका एफआयआरमध्ये न्यायालयीन कोठडीत आहे, विशेष म्हणजे त्या दोन्ही पश्चिम बंगालमध्ये दाखल झाल्या आहेत.

न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन आणि न्या. एन कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठासमोर वजाहत खानची सुनावणी सुरू असताना न्यायाधीशांनी म्हटले की, “ही द्वेषपूर्ण भाषणे आपल्याला कुठेही घेऊन जाणार नाहीत,हिंसाचाराला चिथावणी देणे नेहमीच शारीरिक असण्याची गरज नाही, ती मौखिक सुध्दा असू शकते.” न्या. केव्ही विश्वनाथन यांनी कडक शब्दात फटकारत म्हटले की, “एक प्रसिद्ध तमिळ म्हण आहे की, आगीने झालेली जखम बरी होऊ शकते, परंतु जिभेने झालेली जखम बरी होत नाही.”

खान याची बाजू वरिष्ठ वकील दामा शेषाद्री नायडू यांनी माडली आहे. त्यांनी न्यायालयासमोर महटले आहे की, “खान याने जे पेरले आहे तेच तो कापत(भोगत) आहेत” आणि आम्ही त्यात फक्त एफआयआर एकत्रित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. खान यांने आधीच माफी मागितली आहे आणि तपासात सहकार्य करत आहे,असे वकीलांनी सांगितले.

या प्रकरणात खंडपीठाने पश्चिम बंगाल बाहेर दाखल झालेल्या सर्व एफआयआरमध्ये वजाहत खान यांच्या अटकेला स्थगिती दिली. केंद्र सरकार आणि आसाम, दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या राज्यांना नोटीस बजावली, खान यांच्या विरुद्ध नोंदवलेल्या सर्व एफआयआर एकत्रित करण्याच्या याचिकेवर उत्तर देण्यास सांगितले. या प्रकरणाची सुनावणी आता १४ जुलै रोजी होणार आहे.



Powered By Sangraha 9.0